आंबा पुरी - Amba Puri

Mango Puri in English वेळ: ४५ मिनिटे ४० मध्यम पुऱ्या साहित्य: १ कप मैदा १/२ कप बारीक रवा दिड टेस्पून गरम तूप चिमटीभर मीठ १ किंव...

Mango Puri in English

वेळ: ४५ मिनिटे
४० मध्यम पुऱ्या


साहित्य:
१ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
दिड टेस्पून गरम तूप
चिमटीभर मीठ
१ किंवा २ हापूस आंबा
साखरेच्या पाकासाठी
१ कप साखर
३/४ कप पाणी
केशराच्या काड्या
वेलची पावडर
पुरेसे तेल किंवा तूप पुऱ्या तळण्यासाठी

कृती:
१) आंब्याचा रस काढून घ्यावा. चाळणीतून गाळून घ्यावा. यामुळे गुठळ्या मोडतात आणि रसात जर धागे असतील तर ते काढून टाकता येते.
२) मैदा आणि रवा मिक्स करून घ्यावे. त्यात मीठ घालावे. तेल कडकडीत तापवून रवा-मैद्यावर घालावे. आंब्याचा रस गरजेपुरता घालून घट्ट गोळा मळावा. (सगळा रस लागणार नाही त्यामुळे अंदाज घेउनच रस घालावा). अर्धातास मळलेले पीठ झाकून ठेवावे. त्यानंतर त्याचे लहान लहान गोळे करावे.
३) साखर आणि पाणी एकत्र करून उकळवावे. दोन तारी पाक करून घ्यावा. त्यात केशर आणि वेलची पावडर घालावी.
४) तेल/तूप गरम करावे. आणि आच मध्यम ठेवावी. तेल गरम करतानाच थोड्या पुऱ्या आधीच लाटून तयार ठेवाव्यात. पुऱ्या मध्यम आचेवर तळून घ्याव्यात. कागदावर काढून नंतर लगेच पाकात घालाव्यात. पाक सर्वत्र लागला पाहिजे. अजून ५-६ पुऱ्या तळून होतायत तोवर आधीच्या पुऱ्या पाकातच ठेवाव्यात. नंतर काढून ताटात सेपरेट ठेवाव्यात. एकावर एक रचू नयेत. अशाप्रकारे सर्व पुऱ्या तळून पाकात घालाव्यात.

टीप:
१) एकावेळी चार गोष्टी करायच्या आहेत. पुऱ्या लाटणे, तळणे, पाकात घालणे आणि सेपरेट अरेंज करणे. त्यामुळे थोड्या पुऱ्या तेल तापत असतानाच लाटून ठेवल्या तर सोपे जाईल. किंवा बरोबर कोणाची तरी मदत घ्यावी.

Related

Sweet 8223038971256277528

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item