सुरणाचा किस

Suranacha Kis in English वेळ: १५ मिनिटे वाढणी: ३ ते ४ जणांसाठी साहित्य: २ कप सुरणाचा किस २ टिस्पून तूप १/२ टिस्पून जीरे २-३ हिरव...

Suranacha Kis in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी


साहित्य:
२ कप सुरणाचा किस
२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जीरे
२-३ हिरव्या मिरच्या, मध्यम तुकडे
२ ते ३ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
चवीपुरते मीठ आणि साखर
आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि ओलं खोबरं

कृती:
१) सुरणाचा किस थोडावेळ आमसुलाच्या पाण्यात घालून ठेवावा. यामुळे सुरणाची खाज निघून जाते. नंतर पिळून घ्यावा.
२) कढईत तूप गरम करून त्यात जीरे, मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात सुरणाचा किस घालावा. शेंगदाण्याचा कूट, आणि मीठ घालावे.
३) मंद आचेवर वाफ काढावी. सुरण शिजले की साखर घालावी. कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून मिक्स करावे.
गरम गरम सुरणाचा किस सर्व्ह करावा.

Related

Suran 1304897789359461078

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item